आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा भट्टने शेअर केला 21 वर्षे जुना 'तमन्ना'चा फोटो, बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 21 वर्षांपुर्वीच मार्च 1997 मध्ये एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला महेश भटने डायरेक्ट केले होते. त्यांची मुलगी पूजा भटने चित्रपटात अभिनय केला होता. यासोबतच ती प्रोड्यूसरही होती. या चित्रपटाचे नाव 'तमन्ना' होते. या चित्रपटात पूजा भटच्या बालपणीची भूमिका एका चिमुरडीने केली होती. ती आज बॉलिवूड इंडस्ट्रीची सुपरस्टार बनली आहे. ती म्हणजे आलिया भट... पूजाने 21 वर्षांपुर्वीचा फोटो शेअर करत आलिया भटची प्रशंसा केली आहे. आलियाने चित्रपटात ही भूमिका साकारली तेव्हा तिचे वय 4 वर्षे होते. 


पूजा भटने लिहिले 
पूजा भटने इंस्टाग्रामवर 'तमन्ना' चित्रपटाचे चार फोटो शेअर केले आहे. दोन फोटोंमध्ये आलिया परेश रावल आणि दूस-या फोटोमध्ये ती आशुतोष राणासोबत दिसतेय. एक फोट पूजा भटचा आहे. तिने या फोटोला कॅप्शन देत लिहिले की, "वयाच्या 24 वर्षी मी प्रोड्यूसर म्हणून या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट ख-या आयुष्यावर आधारित होता. टिक्कू नावाच्या मुलीची ही कथा होती. उदरांनी तिचा अर्धा चेहरा कुरतडला होता. मोठी झाल्यानंतर तिला समाजात वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. या कथेवर हा चित्रपट आहे. खुप कमी लोकांना माहिती असेल की, माझ्या दोन बहिणींनी या चित्रपटात काम केले होते. एक आलिया भट आणि दूसरी शाहीन भट. आलियाने चित्रपटात माझ्या बालपणीची भूमिका साकारली होती. तर चित्रपटात आशुतोश राणाच्या मुलीची भूमिका शाहीनने साकारली होती. या चित्रपटात परेश रावल किन्नरच्या भूमिकेत होते. त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. चित्रपट सामाजित समस्येवर आधारित होता. यामुळे चित्रपटाला बेस्ट फिल्म कॅटेगिरीसाठी नॅशनल अवॉर्ड देण्यात आला होता."

 

'राजी' नंतर आलियाचे कर्तृत्त्व वाढले
आलिया आता सुपरस्टार बनली आहे. तिचा नुकताच रिलीज झालेला राजी चित्रपट सुपरहिट ठरला आहे. 'राजी'मध्ये आलियाच्या अभिनयाची सर्वांनीच प्रशंसा केली. जवळपास 40 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला. चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. ती शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटात स्पेशल अपीरियन्स देणार आहे. यासोबतच रणवीर सिंहसोबत 'गल्ली बॉय' आणि रणबीर कपूरसोबत ती 'ब्रम्हास्त्र' मध्ये दिसणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पुजा भटने शेअर केलेले फोटोज...

बातम्या आणखी आहेत...