आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी ट्रान्सप्लांटचे वृत्त खोटे, मला होता हा आजार, राणा दग्गुबत्तीने केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 'बाहुबली' चित्रपटात 'भल्लालदेव'ची भूमिका साकारणा-या राणा दग्गुबत्तीच्या आरोग्याविषयी अनेक वृत्त समोर येत होते. त्याने आता याचा खुलासा केला आहे. त्याने ट्वीटरवर सांगितले की, किडनी ट्रान्सप्लांचे वृत्त हे अफवा आहेत. त्याने रविवारी ट्वीट करुन सांगितले की, 'मी माझ्या आरोग्याविषयी विचित्र गोष्टी ऐकल्या. मी ठिक आहे, फक्त ब्लड प्रेशरची थोडी समस्या आहे, ही समस्या लवकरच ठिक होईल.'
दग्गुबत्तीने पुढे लिहिले 'तुमचे प्रेम आणि चिंतेसाठी धन्यवाद, परंतू माझ्या आरोग्याविषयी अफवा पसरवू नका. ही माझी हेल्थ आहे, तुमची नाही.'

 

सोशल मीडियावर पसरले होते किडनी ट्रान्सप्लांटची अफवा
राणआ दग्गुबतीच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरत होत्या. काही लोक म्हणत होते की, दग्गुबत्ती लवकरच किडनी ट्रान्सप्लांट करणार आहे. तर काही म्हणत होते की, त्याने ट्रान्सप्लांट केले आहे.
- एवढेच नाही तर, त्याची आई त्याला लक्ष्मी राणा त्याला एक किडनी देण्यासाठी तयार आहे आणि ट्रान्सप्लांटसाठी ते अमेरिका किंवा सिंगापुरला जाणार अशाही अफवा होत्या.

'हाथी मेरे साथी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे राणा: बॉलिवूड स्टार राजेश खन्नाच्या 'हाथी मेरे साथी'चा रीमेक बनवला जात आहे. यामध्ये राणा दग्गुबत्ती प्रमुख भूमिकेत आहे. सध्या याची शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज केला जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...