आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer Out: 'साहेब, बीवी और गँगस्टर-3'चा ट्रेलर आउट, संजय दत्तचे दमदार डायलॉग्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई :संजय दत्तचा आगामी चित्रपट 'साहब, बीवी और गँगस्टर-3' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात संजय 'गँगस्टर'ची भूमिका साकारत आहे. तर जिम्मी शेरगिल 'साहब' आणि 'बीवी'च्या भूमिकेत माही गिल आहे. 2.46 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये 58 वर्षीय संजय जबरदस्त थ्रिलर-अॅक्शन सीन करताना दिसत आहे. गँगस्टरची भूमिका त्याला शोभून दिसतेय.


ट्रेलरमध्ये संजयचे दमदार डायलॉग्स...
संजय ट्रेलरमध्ये दमदार डायलॉग्स बोलताना दिसतोय. तो म्हणतो की, "मेरे बारे में जो भी सुना होगा बुरा ही सुना होगा लेकिन मैं इतना बुरा नहीं हूं कि मेरे बगल में खड़े होने से कोई बदनाम हो जाए।" 
- तर ट्रेलरच्या शेवटी त्याचा दूसरा डायलॉग आहे. यामध्ये तो म्हणतो की, "जिंदगी का मजा हमने बहुत कम लिया है, अब वापस लौटा हूं जिंदगी भर का मजा लूंगा।" हे डायलॉग त्याच्या ख-या आयुष्याची कुठे न कुठे इस्पायर करताना दिसतात.


27 जुलैला रिलीज होणार चित्रपट
- चित्रपटामध्ये जिम्मी शेरगिल, साहबच्या लुकमध्ये शोभून दिसत आहे. तो एंट्रीवर डायलॉग बोलतो की, "फक्त तीन गोष्टी आयुष्य बदलू शकतात, ड्रीम्स, सफरिंग आणि प्रेम"
- चित्रपटात जिम्मीच्या बायकोची भूमिका माही गिल साकारत आहे. तर संजयच्या विरुध्द चित्रांगदा सिंह आहे.
- चित्रपटात सोहा अली खान, दीपक तिजोरी, कबीर बेदी आहेत. तिग्मांशु धूलियाच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेला हा चित्रपट 27 जुलैला रिलीज होईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...