आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: बर्सिलोनामध्ये कुटूंबासोबत हॉलिडे एन्जॉय करतोय शाहरुख, पत्नी गौरीने शेअर केले फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सुपरस्टार शाहरुख खान सध्या कुटूंबासोबत हॉलिडे एन्जॉय करतेय. त्याने नुकतीच आपल्या 'झिरो' चित्रपटाची शुटिंग पुर्ण केली आहे. यानंतर तो सहकुटूंब अंबानीच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये आला होता. आता तो कुटूंबासोबत हॉलिडे एन्जॉय करतोय. बर्सिलोनामध्ये शाहरुख खान हा मुलगा अबराम, आर्यन, सुहाना आणि पत्नी गौरी खानसोबत मस्ती करतोय. गौरीने आपल्या इंस्टाग्रामवर याचे काही फोटोज पोस्ट केले आहे. या फोटोंना पसंती मिळतेय. हा फोटो गौरीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये शाहरुख आपली दोन मुलं आर्यन आणि अबरामसोबत दिसत आहेत. या फोटोमध्ये आर्यन आणि अबराम दोघांनीही एकाच रंगाचे जॅकेट घातलेले दिसतेय. 


- गौरी खान आणि शाहरुख यांनी 1991 मध्ये लग्न केले होते. 19 वर्षांचा आर्यन हा त्यांचा मोठा मुलगा आहे. आर्यन कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेतोय. 18 वर्षांची सुहाना त्यांची मुलगी आहे. तर अबराम हा त्यांचा धाकटा मुलगा आहे. 

 

सुहानासोबतच्य फोटोमुळे शाहरुख होतोय ट्रोल
या व्हॅकेशनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शाहरुखची 18 वर्षांची मुलगी सुहाना वडील शाहरुखला गालावर Kiss करताना दिसत आहे. या फोटोवरून सोशल मीडिया यूझर्समध्ये चांगलाच वाद होत आहे. अनेक यूझर्स या मुद्द्यावरून शाहरूख आणि सुहानाला ट्रोल करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...