Home | News | Shraddha Kapoor Deleted Instagram Photos

...यामुळे श्रध्दाने डिलीट केले इंस्टाग्रामवरचे फोटो, चाहत्यांना वाटले अकाउंट झाले हॅक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 11:03 AM IST

सेलेब्सच्या आयुष्यातील सर्व माहिती आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मिळते.

 • Shraddha Kapoor Deleted Instagram Photos

  बॉलिवूड डेस्क: सेलेब्सच्या आयुष्यातील सर्व माहिती आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मिळते. यासाठी फॅन्स त्यांच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर नजर ठेवून असतात. श्रध्दा कपूरने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवरील सर्व फोटोज डिलीट केले आहे. येथे फक्त तीन फोटोज आहेत. यावर लिहिलेय की, 'मर्द को दर्द होगा'. हे पाहून फॅन्स शॉक्ड झाले, त्यांना वाटले अचानक असे काय झाले? अनेकांना वाटले की, तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. परंतू असे काहीच झालेले नाही. हे सर्व नियोजनबध्द पध्दतीने करण्यात आले आहे.

  चित्रपटासाठी केले असे
  - श्रध्दा कपूर आगामी चित्रपट 'स्त्री'मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. राजकुमार राव तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपट साइन करताना करार झाला होता की, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टार्स आपले सोशल मीडिया अकाउंट पुर्णपणे डेडिकेट करतील. यामुळे श्रध्दाने आपले फोटो डिलीट केले आहे. 'मर्द को दर्द होगा' ही चित्रपटाची टॅगलाइन असल्यामुळे श्रध्दाने टॅगलाइन शेअर केली आहे. हा चित्रपट 31 ऑगस्टला रिलीज होणार आहे. अमर कौशिक हा चित्रपट डायरेक्ट करणार आहे. यामध्ये भोपाळच्या लहानश्या गावातील चंदेरी कथा सांगण्यात आली आहे.
  - श्रध्दा लवकरच शाहिद कपूर आणि यामी गौतमसोबत 'बत्ती गुल मीटर चालू'मध्ये दिसणार आहे. याची शूटिंग नुकतीच संपली आहे.
  - सेलेब्सने अचानक आपले अकाउंट डिलीट करण्याचे हे पहिले प्रकरण नाही. यापुर्वीही असे झाले आहे. सेलेब्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर अकाउंटचा वापर करत असतात.

 • Shraddha Kapoor Deleted Instagram Photos

  सुशांत सिंह राजपूतने डिलीट केले अकाउंट


  'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' फेम अॅक्टर सुशांत सिंह राजपूतने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. त्याने त्याच्या सोशल मीडियावरचे सर्व फोटोज डिलीट केले होते. परंतू याचे कारण स्पष्ट झाले नाही. 

   

 • Shraddha Kapoor Deleted Instagram Photos

  फरहानने फेसबुक अकाउंट केले होते डिलीट


  ज्यावेळी ब्रीच ऑफ प्रायव्हसी(breach of privacy)चे प्रकरण समोर आले तेव्हा भारतीय सेलेब्सपैकी सर्वात पहिले फरहान अख्तरने अकाउंट डिलीट केले होते. 

   

 • Shraddha Kapoor Deleted Instagram Photos

  रणबीर गुपचूप इंस्टाग्रामवर 


  - रणबीर कपूर नेहमीच सोशल मीडियापासून दूर राहतो. तो फक्त ब्रांड एंडोर्समेंट आणि प्रमोशन अॅक्टिव्हिटीसाठी इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह राहतो.
  - प्रोजक्ट संपल्यावर तो डीअॅक्टिव्ह होतो. परंतू रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो गुपचूप एका दूस-या नावावरुन इंस्टाग्राम यूज करतो.

   

 • Shraddha Kapoor Deleted Instagram Photos

  राणी 'हिचकी'साठी आली सोशल मीडियावर 


  सोशल मीडियापासून दूर राहणारी राणी मुखर्जी आपल्या 'हिचकी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर आली होती. 
   

Trending