आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Dream Shattered: Cops Find Starlet Begging And Stealing

रस्त्यावर भीक मागताना आणि चोरी करताना दिसली ही अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध मॉडेल ते भिकारी होणारी गीतांजली नागपाल नक्कीच तुमच्या लक्षात असेल. आता अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी २५ वर्षीय अभिनेत्री मिताली शर्माला लोखंडवालाच्या रस्त्यांवर भीक मागताना आणि चोरी करताना पकडले आहे. कुटुंबीयांनी साथ सोडली आणि सिनेसृष्टीत फारसे यश मिळू न शकल्याने मितालीवर भीक मागण्याची वेळ आली आहे.

कोण आहे मिताली शर्मा?
मिताली शर्मा ही मुळची दिल्लीची रहिवाशी असून भोजपुरी अभिनेत्री आहे. तिने अनेक नामांकित ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले आहे. मितालीला पोलिसांनी कारमधून चोरी करताना पकडेल. मितालीला जेव्हा महिला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने पोलिसांना चावा घेतला.

मितालीला अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये असून रस्त्यावर भीक मागणे आणि चोरी करणे, हे काम करु लागली. मात्र मिताली मुंबईत कशी आली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, मितालीने गेल्या काही दिवसांपासून काही खाल्लेले नाही. तिची स्थिती बघता ती दोन-तीन दिवसांपासून रस्त्यावरच भटकत असल्याचे दिसते. मुंबईत ती एकाकी आयुष्य जगत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
मितालीला मानसिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आता तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.