(फाइल फोटो: अभिनेता साहिल खान)
मुंबई- 'स्टाइल' आणि 'एक्सक्यूज मी'सारख्या सिनेमांत काम केलेला अभिनेता साहिल खानची मर्सडिज कार आफताब पटेल नावाच्या एका गँगस्टरने टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने पळवली. पोलिसांनी या घटनेची तक्रार दाखल केली आहे आणि आरोपीचा शोध घेत आहेत. आफताबला मुंबई आणि ठाणेच्या पोलिसांनी तडीपार घोषित केले आहे.
काय आहे प्रकरण?
- एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, साहिलची बहीण शाइस्ताने 7 ऑक्टोबरला एका ऑनलाइन पोर्टलवर मर्सडिज कार विकण्यासाठी जाहिरात दिली होती.
- 8 ऑक्टोबरला आफताबने या जाहिरातीच्या आधारे शाइस्ताशी संपर्क साधला आणि त्याच दिवशी संध्याकाळी तिला भेटायला पोहोचला.
- त्यानंतर 9 ऑक्टोबरला आफबातने सांगितले, की त्याला गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची आहे.
- पोलिसांच्या सांगण्यानुसार, आफताब पटेल चार मित्रांसोबत दोन कारमध्ये शाइस्ताला भेटायला आला होता. टेस्ट ड्राइव्हनंतर 42 लाखांत मर्सडिजचा सौदा झाला.
- आफताबने अॅडवान्स 50 हजार रुपयेसुध्दा साहिलचा ड्राइव्ह अर्शद अन्सारीला दिले.
- दुस-या दिवशी त्याने पुन्हा टेस्ट ड्राइव्ह करण्याची विनंती केली आणि त्यानंतर तो कार घेऊन फरार झाला.
दुस-यांदा कार टेस्ट ड्राइव्हसाठी गेला आणि कार घेऊन गायब झाला-
आफताबने 10 ऑक्टोबरला शाइस्ताला पुन्हा फोन केला आणि सांगितले, की एक-दोन दिवसांत गाडी घेण्यासाठी येईल आणि उरलेले 41.5 लाख रुपये तिच्या अकाऊंटमध्ये जमा करेल. 10 ऑक्टोबरला संध्याकाळी आफताब शाइस्ताच्या घरी आला. त्याने शाइस्ताला सांगितले, की त्याला पुन्हा एकदा कारची टेस्ट ड्राइव्ह करायची आहे. साहिलने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप लावला आहे, की दुस-यांदा टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने आफताबने कार पळवली आहे. तो फोनदेखील उचलत नाहीये.
पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर विरारच्या एका फार्महाऊसवरून आफताबच्या दोन कार जप्त केल्या आहेत. या दोन्ही कारमधूनच आफताब मित्रांसोबत शाइस्ताला भेटण्यासाठी आला होता. पोलिस आफताबचा शोध घेत आहेत. यापूर्वी त्याच्यावर खूनाचा प्रयत्न आणि चोरीची तक्रार दाखल आहे.