आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफताब पत्नीसह पुन्हा अडकला लग्नगाठीत, अचानक विवाह करण्याचे हे होते कारण..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो : बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी पत्नीसह पुन्हा एकदा लग्नगाठीत अडकला आहे. विशेष म्हणजे कायदेशीर विवाह केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी आफताबने पत्नी नीन दुसींजसोबत विवाह केला आहे. 
 
आफताबने 5 जून 2014 रोजी नीनसोबत लग्न केले होते. झाले असे की आफताब आणि नीन श्रीलंकेत फिरायला गेले होते आणि तेथील निसर्गाच्या सुंदरतेमुळे ते इतके प्रभावित झाले की तिथेच दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
 
श्रीलंकेतल्या तंगल्लेमधील ‘अनंतारा पीस हेवन’मध्ये हा विवाहसोहळा पार पडला. एका हत्तीवर बसून आफताबने विवाहस्थळी एन्ट्री घेतली, तर नीन डोलीमध्ये बसून आली.
लग्नसोहळ्याला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. आफताबने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आफताबने शेअर केलेला फोटो..
बातम्या आणखी आहेत...