आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानने मीडियासोबत साजरा केला बर्थडे, ऑनस्क्रिन मुलींविषयी केले हे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता आमिर खानने आज (14 मार्च) वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने आमिरने मीडियासोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. वाढत्या वयाविषयी आमिर म्हणाला, "वय केवळ एक नंबर आहे, हे तुमच्यावर अवलंबून असतं, की मनातून तुम्ही कसे फिल करता." सोबतच दंगल या सिनेमात ऑन स्क्रिन मुलींची भूमिका वठवणा-या फातिया सना शेख आणि सान्या मल्होत्राविषयी बोलताना आमिर म्हणाला, की त्यांच्या भविष्याचे निर्णय मी नव्हे तर त्या स्वतः घेतली.  

यावेळी आमिरने त्याच्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या.  

- आजचा दिवस आमिर फोगाट आणि त्याच्या फॅमिलीसोबत घालवणारेय. 
- वाढदिवसाच्या आदल्या रात्री आमिरने पुस्तके वाचली आणि रात्री 12 वाजता झोपला.
- आमिरने 10 हजार लोकांना पानी फाऊंडेशनचे ट्रेनिंग दिले आहे. 
- 'दंगल'ला मिळालेल्या यशामुळे आमिर आनंदी आहे. याविषयी तो म्हणाला, "माझे सिनेमे नेहमीच यशस्वी होतात. (हसून) मी एखादे पात्र साकारताना कायम त्याचाच विचार करत असतो."
- आमिर कधीच अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावत नाही. कारण त्याच्या मते, प्रेक्षकांची प्रतिक्रिया हीच पुरस्कार असते.  
- राजकारणाविषयी आमिर म्हणतो, की हे क्षेत्र त्याच्यासाठी नाही. तो एक क्रिएटिव्ह पर्सन आहे. 
 
पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत करणारेय स्क्रिन शेअर... 
- आमिर म्हणतो, "मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करणारेय. मला त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी मिळणारेय. यावर्षी जून महिन्यात आम्ही 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत." 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...