आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Absent In A Funeral Of Rajesh Vivek, Team Lagaan Bids Goodbye

'गुरन बाबा' अनंतात विलिन, 'लगान'च्या टीमने घेतले अंत्यदर्शन, आमिरने व्यक्त केला शोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवेक राजेश यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेले आशुतोष गोवारिकर, अमीन हाजी - Divya Marathi
विवेक राजेश यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेले आशुतोष गोवारिकर, अमीन हाजी

मुंबईः 'लगान' सिनेमातील 'गुरन बाबा' ही लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेते राजेश विवेक शुक्रवारी अनंतात विलिन झाले. हैदराबादमध्ये दाक्षिणात्य सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी मुंबईच्या वर्सोवातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
'लगान'च्या टीमने घेतले अंत्यदर्शन
'लगान' सिनेमाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी राजेश विवेक यांना अखेरचा निरोप दिला. याशिवाय लगानमधील अनेक कलाकारांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अखिलेंद्र मिश्रा, दया शंकर पांडेय, अमीन हाजी, दीपराजा राणा, हेमंत पांडे, वी.के. सक्सेना या कलाकारांनी राजेश विवेक
यांना अखेरचा निरोप दिला.
आमिरने ट्विटरच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली
आमिर खान राजेश विवेक यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला नव्हता. मात्र त्याने ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. आमिरने ट्वटि केले, ''Yesterday we lost someone from the Lagaan family...Rajesh Vivek. You will always remain in our hearts Baba. Love. a.''
राजेश विवेक यांच्याविषयी..
राजेश विवेक यांचा जन्म 31 जानेवारी 1949 रोजी उत्तर प्रदेशात झाला होता. त्यांनी जौनपूरमधूनच एमए पूर्ण केलं. त्यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. राजेश विवेक ऑफ बिट भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांनी आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेश’मध्ये शाहरुख खानसोबतही काम केले होते. शिवाय ‘जोधा-अकबर’मध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तसेच राजेश विवेक यांनी अग्निपथ, सन ऑफ सरदार, खेलें हम जी जान से, बंटी और बबली, कच्चे धागे यांच्यासह 30 हून अधिक सिनेमे आपल्या अभिनयाने सजवले. शिवाय ‘महाभारत’ या मालिकेत महर्षी व्यासांची भूमिका साकारली होती. तर ‘अघोरी’ मालिकेतही त्यांची व्यक्तिरेखा लक्षवेधी होती.
पुढे पाहा, राजेश विवेक यांच्या अंत्ययात्रेची छायाचित्रे...