आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आझादच्या प्री-बर्थडे पार्टीत सहभागी झाले आमिर खानच्या पहिल्या पत्नीची मुले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझादचे बर्थडे सेलिब्रेशन. - Divya Marathi
आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझादचे बर्थडे सेलिब्रेशन.

मुंबई - आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद 1 डिसेंबरला 6 वर्षांचा होत आहे. आमिर आणि किरण यांनी थीम पार्कमध्ये आझादचा प्री-बर्थडे सेलिब्रेट केला. याचे फोटो किरण रावने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आझादचे वडील आमिर आणि आई किरण राव केक कापताना दिसतात. 

 

- आझादच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनला आमिरची मुलगी ईरा आणि मुलगा जुनैदही उपस्थित होते. 
- ईरा आणि जुनैद हे आमिरची पहिली पत्नी रीना दत्तापासून झालेली मुलं आहेत. आमिर आणि रीनाचा आता 'तलाक' झाला आहे. 
- किरण-आमिरचा मुलगा आझादचा जन्म सरोगसीद्वारे डिसेंबर 2011 मध्ये झाला होता.  

बातम्या आणखी आहेत...