आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिर खानने लतादीदींसाठी मोडली प्रतिज्ञा, मोहन भागवतांच्या हस्ते प्रथमच स्वीकारला पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'दंगल' चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मुंबईत सोमवारी रात्री दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय माजी क्रिकेटपटू कपिलदेव आणि अभिनेत्री वैजयंतीमाला यांनाही भागवत यांच्या हस्ते 75 व्या मास्टर दीनानाथ पुरस्काराने गौरवण्यात आले.

असहिष्णुता मुद्द्यावर झाली होती टीका
सन 2015 मध्ये पत्नी किरण रावने असहिष्णुतेबाबत वातावरणामुळे आपण चिंतित असून देश सोडून जाण्यासारखे वाटते, असे सांगितल्याचे आमिर म्हणाला होता. त्यावरून मोठा वाद उद्भवला होता. संघानेही आमिरवर टीका केली होती.

या आधी ‘लगान’च्या वेळी होती उपस्थिती
तब्बल 25 वर्षांनंतर प्रथमच आमिरने आपल्या चित्रपटासाठी पुरस्कार स्वीकारला आहे. 16 वर्षांनंतर त्याने एखाद्या चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात हजेरी लावली. याआधी ऑस्कर सोहळ्यात ‘लगान’ चित्रपटासाठी तो उपस्थित राहिला होता.

लता मंगेशकरांसाठी आमिरने मोडला 'पण'
बऱ्याच वर्षांपासून आमिर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यांवर बहिष्कार आहे. आपल्या अनेक चित्रपटांना पुरस्कार मिळायला हवा होता, असे त्याचे म्हणणे होते. मात्र, या वेळी त्याने लतादीदींसाठी आपली प्रतिज्ञा मोडली.

पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, या पुरस्कार सोहळ्याचे काही PHOTOS..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...