आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेने निराश आमिर खान; \'दंगल\'च्या शूटिंगमध्ये व्यग्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -सामाजिक जाणिवांप्रती प्रगल्भ असणाऱ्या आमिर खानने देशातील असहिष्णू वातावरणामुळे देश सोडून जाण्याची भाषा करून वादळ निर्माण केल्याने त्याच्याविरोधात टीकेचा भडिमार होत आहे. त्यामुळे काहीसा चिंतेत असला तरी बुधवारी आमिर लुधियानात "दंगल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. पुढील चार दिवस तो तिथेच राहणार आहे.
आगामी "दंगल' सिनेमाची प्रसिद्धी व्हावी, यासाठी आमिरने मुद्दामहून असहिष्णूपणाचा मुद्दा उचलला, असाही आरोप त्याच्यावर केला जात आहे. मात्र, हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २३ डिसेंबर २०१६ ला प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रचार-प्रसाराचा या क्षणी काही प्रश्न उद्भवत नाही, असे आमिरच्या जवळच्या मित्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
नेत्यांप्रमाणेच अभिनेते ऋषी कपूर, दिग्दर्शक रामगोपाल वर्मा या बॉलीवूडकरांनीही टीका केल्याने आमिरला वाईट वाटले. आमिरची पहिली पत्नी रिना तसेच दुसरी पत्नी किरण या दोघीही हिंदू असून त्याच्या दोन बहिणींचे विवाह हिंदू कुटुंबात झाले आहेत. आमिरचे कुटुंब हे धर्मनिरपेक्ष असून त्याच्या वागण्या-बोलण्यातही कधीच धर्म, जातीपातीचा साधासा उल्लेख आढळलेला नाही. विशेष म्हणजे ऋषी, रामगोपाल, अनुपम खेर तसेच अन्य कलाकारांनाही आमिरचे वागणे-बोलणे चांगलेच ठाऊक आहे; तरीही या सर्वांनी इतक्या वर्षांच्या जवळच्या संबंधांचा जराही विचार केला नसल्याने टीकेची राळ उठवून दिल्याने आमिर खूपच निराश झाला आहे, असेही या मित्राने सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आमिरचा मित्र म्हणाला अनुपम खेर प्रसिद्धीसाठी भुकेले..