आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर म्हणाला- आईसोबत साजरी करणार ईद, रात्री 9 वाजता बघणार \'बजरंगी भाईजान\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीडियासोबत बातचीत करताना पत्नी किरण राव, मुलगा आजादसोबत आमिर खान - Divya Marathi
मीडियासोबत बातचीत करताना पत्नी किरण राव, मुलगा आजादसोबत आमिर खान
मुंबई- आज देशभरात ईदची धूम आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानसुध्दा या सणाविषयी उत्साही आहे. शनिवारी (18 जुलै) त्याने आणि पत्नी किरण रावने माध्यमांना सांगितले, की तो या ईदला कसे स्पेशल बनवणार आहे. आमिर म्हणाला, या सणासाठी तो पत्नी आणि मुलगा (आजाद) यांच्यासोबत आईच्या येथे जाणार आहे. त्याचे कजिन्ससुध्दा तेथे येणार आहेत. आमिर आपल्या आईपासून वेगळा म्‍हणजे पत्नी आणि मुलासोबत कार्टर रोड स्थित घरी राहतो.
मीडियासोबत इंटरेक्शनदरम्यान आमिरने आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. तो म्‍हणतो, 'लहानपणी आम्‍ही ज्येष्ठांना नमस्कार करायचो. मनसोक्‍स बागडायचो. त्यावेळी एक किंवा दोन रुपये मिळत होते. त्या पैशाचे आम्ही पतंग आणायचो.' किरण रावने आजादविषयी सांगितले की, त्यालाही ईदविषयी समजायला लागले आहे.
रात्री पाहणार 'बंजरंगी भाईजान'
मीडियासोबत बातचीत करताना आमिरने स्पेशल प्रोग्रामविषयी सांगितले. आमिर म्हणाला, 'रात्री 9 वाजता 'बजरंगी भाईजान' पाहणार आहे. सिनेमाविषयी खूप प्रशंसा ऐकली. माझ्यासोबत भाऊ आणि बहीणसुध्दा येणार आहे. सलमानला वेळ असला तर तोही आमच्या या स्पेशल कार्यक्रमात आमच्यासोबत येईल. त्याचा मॅसेज आला होता आणि त्यानेच ही स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केली आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मीडियासोबत बातचीत करताना आमिर खानचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...