आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानचा 'दंगल' ठरला जगातील सर्वाधिक कमाई करणारा तिसावा चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनसह जगभरात प्रदर्शन झाल्यानंतर आमिर खानच्या 'दंगल'ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा नव्या जोमाने गल्ला भरला. सध्याच्या आकडेवारीनुसार 'दंगल' २०१६ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा ३० वा चित्रपट ठरला आहे. ट्रेंड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. त्याने सांगितले की, 'एलिस थ्रू लुकिंग ग्लास' या चित्रपटाला मागे टाकत दंगलने ३०.१ कोटी डॉलरचा व्यवसाय केला आहे.' आमिर खानच्या दंगलची खरी स्पर्धा बाहुबलीशी होती, मात्र बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालूनही दंगलने आपला गल्ला खळखळताच ठेवण्यात यश मिळवले. २३ डिसेंबर २०१६ ला प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट टॉप-५ मध्ये होता. चीनमध्ये या चित्रपटाने ९०० कोटींपेक्षाही जास्त व्यवसाय केला आहे. 
 
पुढे वाचा, चीनच्या राष्टपतींकडून कौतुक...  
बातम्या आणखी आहेत...