नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता आणि टीव्ही शो 'सत्यमेव जयते'चा निर्माता
आमिर खान अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आमिरला एका सामाजिक कार्यकर्ताने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारची परवानगी न घेता 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात राष्ट्रीय प्रतिक चिन्हाचा वापर केल्याचा ठपका आमिरवर ठेवण्यात आला आहे. विना परवानगी राष्ट्रीय चिन्हाचा वापर करून आमिरने कायद्याचे (2009) उल्लंघन केल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ता मनोरंजन रॉय यांनी आमिर खानला नोटीस पाठवली आहे. आमिर खानने 'सत्यमेव जयते'मध्ये राष्ट्रीय चिन्हाचा वापर केला आहे. रॉय यांनी वकील मनोज सिंह यांच्याद्यारा आमिरला ही नोटीस पाठवली आहे. आमिरला केंद्र सरकारचा ना हरकत दाखला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सत्यमेव जयतेच्या प्रोड्युसरने ना हरकत दाखला सादर न केल्यास आमिर खानवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे रॉय यांनी म्हटले आहे.
'सत्यमेव जयते'चा प्रोड्यूसर स्वत: आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव आहे. सत्यजीत भटकल हे या शोचे डायरेक्टर आहेत. या तिघांनी रॉय यांनी नोटीस पाठवली आली आहे. राष्ट्रीय चिन्हाचा वापर देशसेवेसाठी केला जातो. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी केला जात नाही, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी आमिर, किरण आणि भटकल यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.