आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Alert: Aamir Khan Meets Dilip Kumar At Lilavati Hospital

दिलीप साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला हॉस्पिटलमध्ये पोहोचला आमिर, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायरा बानो आणि दिलीप साहेबांसोबत अभिनेता आमिर खान - Divya Marathi
सायरा बानो आणि दिलीप साहेबांसोबत अभिनेता आमिर खान

मुंबईः अभिनेता आमिर खानने बुधवारी लिलावती रुग्णालयात जाऊन ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या तब्येतीची चौकशी केली. या भेटीचे एक छायाचित्र दिलीप साहेबांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करुन लिहिले, "Allah's mercy and blessings on all for keeping me in your duas. Thank you @aamir_khan for spending time."

दिलीप कुमार गेल्या काही दिवसांपासून ताप आणि चेस्ट इंफेक्शनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी (15 एप्रिल) त्यांना श्वासोच्छवासाला त्रास जाणवला होता. त्यानंतर त्यांना रात्री दोनच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची तब्येत स्थिर असून आज (गुरुवारी) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रुग्णालयाच्या बाहेर क्लिक झालेली आमिरची छायाचित्रे...