आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरच्या 'दंगल'चे पहिले पोस्टर रिलीज, 23 डिसेंबरला रिलीज होणार फिल्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘दंगल’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींवर ‘दंगल’ हा सिनेमा आधारित आहे. आमिर खानने ट्विटरवरून ‘दंगल’चे नवे पोस्टर रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये महावीर फोगट यांच्या भूमिकेतील आमिर आणि सिनेमात त्यांच्या मुलींची भूमिका साकारणा-या अभिनेत्रींची झलक दिसते.
आज सर्व क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. ती कुठेही कमी पडत नाही. मुलांपेक्षा मुली या कधीच कमी नसतात, हाच संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या पोस्टरवर ‘म्हारी छोरियाँ छोरों से कम है के?’ अशी टॅगलाइन देण्यात आलेली आहे. आमिरचा हरयाणवी लूकही आपल्याला पहायला मिळतोय.
फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा या गीता फोगट आणि बबिता कुमारी यांच्या भूमिकेत सिनेमात दिसतील. अभिनेत्री साक्षी तन्वर सिनेमात आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर्षी 23 डिसेंबरला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आमिरची 'दंगल' फिल्ममधील लूकची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...