आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने टोचले कान, नाक, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानने चित्रपटासाठी केले पियर्सिंग - Divya Marathi
आमिर खानने चित्रपटासाठी केले पियर्सिंग
मुंबई - आमीर खान हा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. चित्रपटांत परफेक्ट लूक मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. दंगलसाठी त्याने भरपूर वजन वाढवले आणि पुन्हा स्लिम फिट झाला. आता आमिरने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या कॅरेक्टरसाठी नाकात नथणीही घातली आहे. त्यासाठी आमिरने रियलमध्ये नाक आणि कान टोचले आहेत. तसेच त्याने चित्रपटासाठी पुन्हा एकदा वजन कमी केले आहे. 

आमिरबरोबर हे स्टारही झळकणार.. 
- सध्या माल्टामध्ये सुरू असलेल्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी  18 व्या शतकातील जहाजांसारखे दोन जहाज तयार करण्यात आले आहेत. 
- चित्रपटात अमिताभ बच्चनही लीड रोलमध्ये आहे. 
- विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटात आमीरबरोबर फातेमा सना शेख आणि कतरिना झळकणार आहे. 

आमिरच्या दंगलचा चीनमध्ये विक्रम 
- आमिरच्या दंगल चित्रपटाने जगभरात 2000 कोटींची कमाई केली आहे. एवढी कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट बनला आहे. सोमवारी दंगलने चीनमध्ये 2.5 कोटींची कमाई केली. 
- यापूर्वी एकाही भारतीय चित्रपटाला वर्ल्डवाईट 2 हजार कोटींची कमाई करता आलेली नाही. 
- दंगल चीनमध्ये कमाई करणारा 5 सर्वात मोठा नॉन इंग्लिश आणि जगभरातील 2016 चा 30वा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. 
- चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी मोदींना याबाबत सांगितले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शुटिंगच्या सेटवरून इन्स्टाग्रामवर शेयर झालेले 3 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...