आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज झाले आमिरच्या बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचे पहिले पोस्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दंगल'चे पोस्टर
मुंबई: आमिर खानच्या बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये आमिर अँग्री लूकमध्ये दिसत आहे. सिनेमाची टॅगलाइन आहे 'आज से दंगल शुरू'.
आमिरने आपल्या टि्वटर पेजवर पोस्टर प्रदर्शित केले आहे. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूरद्वारा निर्मित करण्यात आलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन नीतेश तिवारी करत आहेत.
'दंगल'ची कहानी हरियाणाच्या पार्श्वभूमीवरप आधारित आहे. ही हरियाणाचे पहिलवान महावीर सिंह यांची कहाणी आहे, ते आपल्या घरात आखाडा तयार करून मुलींचा ट्रेनिंग देतात. 'दंगल'मध्ये आमिर, महावीर सिंहच्या भूमिकेत आहे.
आमिरच्या पत्नीची भूमिका साक्षी तंवर साकारत आहेत. तसेच त्याच्या मुलींच्या भूमिकेत नवोदित चेहरे फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा दिसणार आहे. सिनेमा 2016 ख्रिसमसवर रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरने या सिनेमासाठी बदलेला लूक...