आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे सेलिब्रेट करत नाही आमिर खानचा भाऊ, शेअर केल्या आयुष्यातील या खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैजल खान आई झीनतसोबत - Divya Marathi
फैजल खान आई झीनतसोबत
मुंबई: आमिर खानचा भाऊ फैजल खान बुधवारी 50 वर्षांचा झाला. (बर्थडे डेट- 3 ऑगस्ट 1966) बर्थडेनिमित्त फैजलने भाऊ आमिरसोबतची बाँडिंग, फ्यूचर प्रोजेक्ट्स आणि काही अविस्मरणी आठवणी divyamarathi.comसोबत शेअर केल्या आहेत. त्याने सांगितले, की त्याचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात होता. परंतु मोठा झाल्यानंतर त्याना बर्थडे सेलिब्रेट करणे सोडून दिले.
काय करतो बर्थडेच्या दिवशी?
फैजल खानने सांगितले, की तो त्याच्या बर्थडेच्या दिवशी केवळ फॅमिली मेंबर्सच्या उपस्थितीत चॉकलेट केक खातो. यावर्षी त्याचा कोणताच विशेष प्लान नव्हता.
बालपणी कसा स्पेशल असायचा बर्थडे?
फैजल सांगतो, 'माझी आई झीनत हुसैन माझा बर्थडे खास बनवायची. ती केक, फुगे अशा सर्व गोष्टी आणायची. मला आठवते, एकदा माझी काकू घरी आली होती. तिचा वाढदिवस 2 ऑगस्ट आणि माझा 3 ऑगस्टला असतो. माझ्या छोट्या बहिणीचा बर्थडे 4 ऑगस्टला असतो. म्हणून हे सेलिब्रेशन मोठा होते. आईने रेसकोर्स केक ऑर्डर केला, त्यामध्ये दुस-या, तिस-या आणि चौथ्या पोझिशनमध्ये घोडे दिसत होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, फैजल कोण-कोणत्या गोष्टी शेअर केल्या...
बातम्या आणखी आहेत...