आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानच्‍या कारची दुचाकीस्‍वाराला धडक, चालक गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवुड अभिनेता आमिर खान नवीन संकटात सापडला आहे. शुक्रवारी रात्री त्‍याच्‍या कारने एका दुचाकीस्‍वाराला धडक दिली आहे. आमिर खान रायगडवरून पंचगनी येथे जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाला असून तो हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार घेत आहे.
ड्रायव्‍हर चालवत होता कार
सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, आमिरच्‍या ज्‍या कारने दुचाकीस्‍वाराला धडक दिली ती कार आमिर नाही तर त्‍याच्‍या ड्रायव्‍हर चालवत होता. या अपघातानंतर आमिर पूर्णपणे सुरक्षित होता. धडकेनंतर त्‍यानेच त्‍वरित पोलिस अधिका-यांशी संपर्क करून या अपघाताची माहिती दिली. आमिरनेच त्‍या दुचाकीस्‍वाराला हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले व त्‍यांच्‍या प्रकृतीची खबरदारीही घेतली.