मुंबई - 23 डिसेंबर 2016 रोजी रिलीज झालेला आमीर खानचा दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे रोज नवे विक्रम करत आहे. चित्रपटाने 17 दिवसांत बॉक्स ऑफिसवरव 345 कोटींची नेट कमाई केली आहे. विशेष म्हणजे, हा फक्त भारतातील कमाईचा आकडा आहे. त्यामुळे हा आतापर्यंतचा बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत या यादीत आमीरचा 'पीके' (2014) 339 कोटींच्या कमाईसह आघाडीवर होता.
रविवारी कमावले 14 कोटी
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार 'दंगल' ने रविवारी 14.33 कोटींची कमाई केली आहे. त्यांनी लिहिले, "Dangal collects a WHOPPING 31.79 cr in Weekend 3... [Week 3] Fri 6.66 cr, Sat 10.80 cr, Sun 14.33 cr. Total: 345.30 cr. India biz. ATBB"
ओव्हरसीजमध्ये 180 कोटींपेक्षा अधिक कमाई
'दंगल' ने रविवारी (8 जानेवारी) पर्यंत ओव्हरसीजमध्ये एकूण 180.6 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबतही ट्वीटरवर माहिती दिली. त्यांच्या पोस्टनुसार, "Dangal-OVERSEAS - Total till Sun, 8 Jan: $ 26.47 million [₹ 180.58 cr]... Crosses $ 11 million in USA-Canada. AWESOME!"
पुढील स्लाइड्सवर पाहुयात बॉलीवूडच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांची आकडेवारी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)