आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा विचार नाही, हा देश माझा आहे \' - आमिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: आमीर खानने असहिष्णुता वादाबाबतच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. एक प्रसिद्धी पत्रक काढून त्याने हे स्पष्टीकरण दिले आहे. आमिर म्हणाला, “माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा कोणताही विचार नाही. हा देश माझा आहे आणि माझे माझ्या देशावर प्रेम आहे.''
एका पुरस्कार सोहळ्यात ‘पुरस्कार वापसी’ कॅम्पेनचे समर्थन करताना आमिर म्हणाला होता की, ‘देशामध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे आणि माझी पत्नी किरणला आमच्या मुलांची प्रचंड काळजी वाटत असून तिने देश सोडून जाण्याचे माझ्याकडून बोलून दाखवले.’ आमिरच्या या विधानावर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. अखेर आमिरने या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण देत वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
आमिरचे स्पष्टीकरण
सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो, माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा कोणताही विचार नाही, नव्हता आणि नसेल. जे कोणी अशा गोष्टी पसरवत आहे, त्यांनी एकतर माझी मुलाखत पाहिली नाही किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत माझा देश आहे, मी देशावर अतिशय प्रेम करतो आणि ही माझी मातृभूमी आहे.
दुसरे म्हणजे, मुलाखतीदरम्यान मी जे काही म्हटले, त्यावर मी ठाम आहे. जे मला देशद्रोही म्हणतात, त्यांना मला सांगायचे आहे, की भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या वस्तूस्थितीसाठी मला कोणाचाही परवानगीची किंवा प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
तसेच जे या काळात माझ्या सोबत आहेत त्या सर्वांचे धन्यवाद. आपण या सर्वात सुंदर आणि वैविध्यतेने नटलेल्या देशाचे संरक्षण केले पाहीजे. आपण या देशाचे एकात्मता, वैविधता, समग्रता, विविध भाषा, संस्कृती, इतिहास, सहिष्णूता, एकांतवादची कन्सेट, प्रेम, संवेदनशीलता आणि भावनिक क्षमता यांचे संरक्षण केले पाहिजे.