आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan’S Step Brother Hyder Ali Khan Opens Up In His Favour

आमिरला पाठिंबा द्यायला पुढे आला त्याचा सावत्र भाऊ, म्हणाला, 'त्याला बोलण्याची एक संधी द्या'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन अभिनेता आमिर खानवर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी त्याने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मात्र काही लोक त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. यापैकीच एक नाव आहे हैदर अली खान. हैदर हा आमिर खानचा सावत्र भाऊ आहे.
अलीकडेच divyamarathi.com ला दिलेल्या एका मुलाखतीत हैदरने आपली बाजू मांडली. तो म्हणाला, ''आमिर एक सेलिब्रिटी आहे. लोक त्याच्यावर आणि त्याच्या सिनेमांवर प्रेम करतात. आमिरला ठाऊक आहे, तो काय करतोय. मात्र त्याने काय विचार करुन हे वक्तव्य केले, हे मला ठाऊक नाही. मात्र यामागे त्याचे एखादे लॉजिक असणार हे नक्की.''
हैदर पुढे म्हणतो, ''मी भारताचा नागरीक असल्याचा मला अभिमान आहे. आमिरलासुद्धा असेच वाटत असेल. आमिरचे आपल्या देशावर प्रेम आहे.''
हैदरने आमिरच्या चाहत्यांना अपील करताना म्हटले, ''मी सर्वांना एवढी विनंती करु इच्छितो, की सर्वांनी आमिरला पाठिंबा द्यावा, त्याला त्याचे म्हणणे मांडण्याची एक संधी द्यावी.''
हैदर, दिग्दर्शक ताहिर हुसैन यांचा धाकटा मुलगा आहे. हैदरने रेहान खान या नावाने 'दिल तो दिवाना है' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.