आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

74th बर्थडेला अमिताभ बच्चन म्हणाले, राष्‍ट्रपती बनणार नाही, शत्रुबाबू चेष्टा करतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 74वा वाढदिवस आहे. ते अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी आपल्या 'जलसा' बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.

आपण राष्ट्रपती बनण्याचा प्रश्नच उद्धभवत नसल्याचे अमिताभ यांनी मजेशीर उत्तर दिले. राष्ट्रपतीपदासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ यांचे नाव पुन्हा चर्चेच आणले होते. पण, शत्रुघ्न बाबू चेष्टा करतात, हा त्यांचा बालिशपणा आहे. पण आपण कधीही राष्ट्रपती होणार नसल्याचे, अमिताभ यांनी वाढदिवशी स्पष्ट केले.

कुठून आली केक कापण्याची प्रथा....
- कुठून आली वाढदिवशी केक कापण्याची प्रथा? असा सवाल अमिताभ यांनी मीडियाला केला. ते म्हणाले, केक कापण्याची प्रथा बंद करायला हवी. मला माहीत नाही ही‍ प्रथा कुठून आली. मेनबत्त्या का लावल्या जातात. नंतर त्या विझवल्या जातात. एका धारदार सुरीने केक कापला जातो. आजकाल तर एक नवा ट्रेंड आला आहे. तो म्हणजे वाढदिवशी संपूर्ण चेहर्‍यावर केक लावला जातो.

जवानांंच्या पाठीशी खंबीरपणे उभंं राहाण्याची गरज...
भारत-पाक सीमेवर तणाव आहे. पाकिस्तानच्या कुरापती सुरु आहेत. दहशतवादी घुसखोरी करत आहेत. या घटनांमुळे देशातील जनता अतिशय संतप्त आहे. जवान आणि सैन्यदल प्राणांची बाजी लावत आहे. त्यामुळेे आपण सुरक्षित आहोत. त्यांच्याप्रती एकता दाखवण्याची हीच खरी वेळ असल्याचे अमिताभ यांनी यावेळी सांगितले. जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची गरज असल्याचे मत अमिताभ यांनी व्यक्त केले.

पुढील स्लाइडडवर वाचा, पाकिस्तानी कलाकारांबद्दल काय म्हणाले अमिताभ....
बातम्या आणखी आहेत...