आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्वर्या-अभिषेकने लाडकी लेक आराध्याच्या B\'dayला हा खास केक केला होता ऑर्डर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 16 नोव्हेंबर रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लाडकी लेक आराध्या सहा वर्षांची झाली. यानिमित्ताने त्यांच्या जुहूस्थित प्रतीक्षा बंगल्यावर एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीचे फोटोज आराध्याचे आजोबा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले होते. 


आता केकचे फोटो आले समोर..

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी आराध्याच्या बर्थडे केकचेसुद्धा काही फोटोज पोस्ट करुन त्याला कॅप्शन दिले, “And the birthday girl glows at her celebration .. demure in her new dress .. considerate in sharing her cake .. and the pride of the family .. girls always are.” 
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाला खास बेल्जियम चॉकलेट केक ऑर्डर केला होता. या मल्टी लेयर केकवर एक एंजल होती आणि केकला पिंकल कलरचे सुंदर फुलांनी सजवण्यात आले होते. पिंक हा आराध्याचा आवडता रंग आहे.

 

आराध्याने तिच्या वाढदिवसाला मनीष मल्होत्रा यांनी खास तिच्यासाठी डिझाइन केलेला तब्बल 60 हजार रुपये किंमतीचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. खरं तर दरवर्षी ऐश्वर्या आराध्यासाठी थीम बेस्ड पार्टीचे आयोजन करत असते. मात्र यंदा असे नव्हते. या पार्टीत अनेक स्टार किड्स उपस्थित होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, केकचे आणखी 2 PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...