आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिषेकने ऐश्वर्या-आराध्याचा झोका घेतानाचा PHOTO केला पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोका खेळताना आराध्या आणि ऐश्वर्या, इनसेटमध्ये अभिषेक बच्चन - Divya Marathi
झोका खेळताना आराध्या आणि ऐश्वर्या, इनसेटमध्ये अभिषेक बच्चन

मुंबईः अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी नुकताच त्यांची लेक आराध्याचा सहावा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर झालेल्या ग्रॅण्ड बर्थडे पार्टीत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसोबत सहभागी झाले होते. बर्थडे पार्टीचे अनेक फोटोज अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता अभिषेकने या पार्टीतील एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऐश्वर्या आणि आराध्या झोका घेताना दिसत आहेत. फोटो पोस्ट करुन अभिषेकने त्याला कॅप्शन दिले, Happiness. दोघींच्या चेह-यावरचे हास्य बघून त्यांनी आकाश पाळण्यातील राइड किती एन्जॉय केली असेल, याचा अंदाज बांधता येतो. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन, निर्माता बंटी वालिया आणि अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अबराम यांनीदेखील आकाश पाळण्याची राइड एन्जॉय केली. या चौघांचा झोका खेळतानाचा एक व्हिडिओ अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिल्पा तिचा मुलगा वियानसोबत या पार्टीत उपस्थित होती. (व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा..)

 

बातम्या आणखी आहेत...