आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमे मिळत नसल्याने तणावात होती आरती, हलाखीची झाली होती आर्थिक परिस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आरती अग्रवाल)
एन्टरटेन्मेंट डेस्कः 31 वर्षीय बॉलिवूड आणि तेलगू अभिनेत्री आरती अग्रवाल हिचे 6 जून (शनिवारी) निधन झाले. आरतीच्या मॅनेजरने एका वृत्तसंस्थेला तिच्या मृत्युविषयी माहिती दिली. न्यूजर्सीमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना हार्ट अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाला. स्थूलपणा आणि फुफ्फुसांच्या आजाराशी तिची झुंज सुरु होती. उपचारादरम्यान तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच तिची प्राणज्योत मालवली.

अयशस्वी ठरली शस्त्रक्रिया
आरतीवर न्यू जर्सीतील अटलांटिक सिटीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही वर्षांपासून तिला अस्थमाचा त्रास होता. महिन्याभरापूर्वी तिच्यावर लाइपोसक्शन सर्जरी करण्यात आली होती. मात्र सर्जरी अयशस्वी ठरल्याने तिची तब्येत खालावत गेली. त्यानंतर तिला श्वासोच्छवासाला त्रास होऊ लागला होता. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले.
काम मिळत नव्हते, आर्थिक परिस्थिती झाली होती बेताची...
या सर्जरीपूर्वी आरतीने हैदराबाद येथील एका डॉक्टरांशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी ही सर्जरी करण्यास तिला नकार दिला होता. असे म्हटले जाते, की आरतीला सिनेमांच्या ऑफर्स येणे बंद झाले होते. काम मिळत नसल्याने ती तणावात होती. तिची आर्थिक परिस्थितीतसुद्धा बेताची झाली होती. याच कारणामुळे तिचा स्थुलपणा वाढत गेला. स्थुलपणापासून सुटका व्हावी यासाठी तिने सर्जरी करुन घेण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूडनंतर वळली होती दक्षिणेकडे...
न्यू जर्सीत जन्मलेली आणि तिथेच लहानाची मोठी झालेल्या आरतीने वयाच्या 16 व्या वर्षी 'पागलपन' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र हा सिनेमा फारसा चालला नव्हता. त्यानंतर 2001 मध्ये तिने तेलगू सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला होता. तिथे तिने अनेक हिट सिनेमे दिले. आपल्या करिअरमध्ये आरतीने चिरंजीवी, नागार्जुन आणि महेशबाबू यांच्यासह अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले.
आत्महत्येचासुद्धा केला होता प्रयत्न
2005 मध्ये को-स्टार तरुणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आरतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने आपल्या करिअरमध्ये तेलगू, तामिळ आणि हिंदीत एकुण 25 सिनेमे केले. शुक्रवारी (5 जून) तिचा 'रमन 2' हा सिनेमा तेलंगाना आणि आंध्रप्रदेशात रिलीज झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आरती अग्रवालची निवडक छायाचित्रे...