आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ab Tak Chhappan 2 : Exclusive Interview With Nana Patekar

Interview: \'अॅक्शन आवडत नसूनदेखील \'अब तक छप्पन-2\'मध्ये एन्काऊंट कॉप आहे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्या यावर्षी 2004मध्ये आलेल्या 'अब तक छप्पन' सिनेमाचा सिक्वल येत आहे. या सिनेमाचे नाव 'अब तक छप्पन 2' असे आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 27 फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. मागिल काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. प्रेक्षकांना नाना पाटेकर यांचे दमदार डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. सिनेमाचे वैशिष्ट म्हणजे, पहिल्या सिनेमाच्या तब्बल 11 वर्षांनी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे. 'अब तक छप्पन' 2004मध्ये 27 फेब्रुवारी रिलीज झाला होता. दिग्दर्शक एजाज गुलाब यांचा हा पहिलाच सिनेमा होता. आतापर्यंत ते अनेक मोठ्या सिनेमांचे दिग्दर्शक राहिले आहेत. सिनेमामध्ये अभिनेत्री गुल पनाग आणि आशुतोष राणासुध्दा होते.
'अब तक छप्पन'मध्ये नाना पाटेकर यांनी मुंबई पोलिस एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकचे पात्र साकारले होते. याच्या भाग-2मध्येसुध्दा नाना एन्काऊंटर कॉपच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाना या सिनेमात पोलिस निरीक्षक साधु अगाशेच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाना पाटेकर अभिनीत 'अब तक छप्पन 2' सिनेमाची कहानी मागील सिनेमाच्या कहानी जिथे संपली होती तिथून पुढे दाखवण्यात येणार आहे. divyamarathi.comने सिनेमाच्या मुख्य भूमिकेत असलेल्या नाना पाटेकर यांच्याशी बातचीत केली. सादर आहेत त्यातील काही अंश...
- साधु अगाशे 11 वर्षानंतर पुन्हा एकदा 'अब तक छप्पन-2'मध्ये दिसणार आहे. एक एन्काऊंटर स्पेशालिस्ट नात्याने दिर्घकाळानंतर ते गुन्हेगारीत कोणता बदल पाहत आहेत?
उत्तर- पहिल्यापेक्षा गुन्हेगारी खूप बदलली आहे. पहिले गुन्हेगार खूप गरीब आणि अशिक्षित होते. त्यांना पकडणे सोपे होते, कारण ते पोलिसांच्या जाळ्यांबद्दल आणि अटक करण्याच्या पध्दतीं बाबत अज्ञान होते. परंतु आता शिक्षित लोक गुन्हेगारीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी आणि घोटाळ्यांचा आलेख वाढत चालला आहे. ज्यांना आपण चांगले आणि योग्य व्यक्ती समजतो, तेच वाईट असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अभिनेता नाना पाटेकर यांचा संपूर्ण मुलाखत...