आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Singer Abhijeet Bhattacharya Controversial Tweets

रस्त्यावर झोपणाऱ्यांना अभिजीतने म्हटले \'कुत्ता\', सोशल मीडिया युजर्स संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गायक अभिजीत भट्टाचार्य आणि त्याचे ट्विट)

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रस्त्यावर झोपणे म्हणजे सुसाइड करणे होय. जे फुटपाथवर झोपतात, ते मुर्ख आहेत. त्यांना शिक्षा व्हायला हवी, असे त्याने ट्विटरवर म्हटले आहे.
इतकेच नाही तर फुटपाथवर झोपणा-यांना अभिजीतने 'कुत्ता' असे म्हटले आहे. 'कुत्ता रोड पर सोएगा, कुत्ते की मौत करेगा', असे त्याचे म्हणणे आहे. मी स्वतः बेघर होतो, तेव्हा कधीही रस्त्यावर झोपलो नाही, असेही तो म्हणाला.
एका वृत्तवाहिनीशी बोलतानासुद्धा अभिजीतने आपली मुक्ताफळे उधळली. आपले म्हणणे योग्यच असल्याचे तो पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसला.
हिट अँड रन प्रकरणी आज सलमान खानला सेशन कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तेरा वर्षांपूर्वी मद्यधूंद अवस्थेत सलमान खानने मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना आपल्या कारने चिरडले होते. कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर अभिजीतने ट्विटरवर हे वादग्रस्त ट्विट केले. आता त्याच्या या वक्तव्याने मोठ्या वादाला तोंड फोडले हे नक्की.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अभिजीत भट्टाचार्यने केलेले वादग्रस्त ट्विट्स...