Home »News» Abhishek Bachchan, Aishwarya Rai Visited Siddhivinayaka Temple On Occassion Of Marriage Anniversary

अभि-ऐशच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण, आराध्यासोबत घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 10:53 AM IST

मुंबई - अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त हे दोघेही मुलगी आराध्यासोबत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी ऐश्वर्यांनी पांढरा-पिंक रंगाचा सूट घातला होता तर अभिषेकने कुर्ता घातला होता.
ऐश्वर्याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने या दोघांनीही साधेपणाने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले होते. यावेळी अभिषेकने ट्वीट केले, "And just like that.... It's been 10 years! Thank you all for the wishes for Aishwarya and I. Lots of love."
अभिषेक-ऐश्वर्याचे लग्न 20 एप्रिल 2007 मध्ये झाले होते. ऐश्वर्याने 16 नोव्हेबर 2011 साली मुलगी आराध्याला जन्म दिला. हे लग्न अमिताभ यांचा बंगला 'प्रतिक्षा' वर झाले होते तर रिसेप्शन हॉटेल ताज मध्ये झाले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिषेक-ऐश्वर्या दर्शनाला जातानाचे फोटो...

Next Article

Recommended