आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...ज्युनियर बच्चनचा पारा चढतो तेव्हा; कधी चमकणार, या प्रश्नावर उत्तर देणे टाळले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांचा पुत्र असूनही अभिषेक बच्चन बॉलीवूडमध्ये स्वतःचा म्हणावा तसा ठसा उमटवू शकला नाही. अमिताभ वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही प्रेक्षकांची मने जिंकतात. पत्नी ऐश्वर्या आई झाल्यानंतरही बॉलीवूडमध्ये यशस्वी होत असल्याने अभिषेक पुरता कोंडीत सापडला आहे. त्यामुळे त्याला जेव्हा चित्रपटाचा सोलो नायक म्हणून कधी दिसणार, असा प्रश्न केला असता तो प्रचंड रागावला. तसेच त्यानंतर त्याने शांतपणे उत्तर देण्याचे टाळले.
आजवर अभिषेकचे मोजके चित्रपट सोडले तर सध्या तो मल्टिस्टारर चित्रपटांमध्येच दिसून येत आहे. "हाऊसफुल्ल ३' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसरवही चांगला व्यवसाय करत आहे. यात अक्षयकुमारच अधिक भाव खाऊन जात आहे. नुकतेच या चित्रपटाच्या यशानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान अभिषेकला विचारले की, तुझा सोलो नायक म्हणून चित्रपट कधी येणार आहे. या प्रश्नावर तो प्रचंड रागावला. त्याने प्रश्नाला बगल देत सोलो म्हणजे "चित्रपटात मी एकटाच' असा याचा अर्थ आहे का ? असा प्रतिप्रश्न केला. सोलोचा अर्थ काय असे त्याने उपस्थित पत्रकारांना विचारले. "गुरू', "ब्लफ मास्टर' या चित्रपटात मी मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होताे. तसेच यात माझ्याबरोबर रितेश देशमुख, बोमन इराणी, ऐश्वर्या राय हे कलाकारही होते. तुम्ही त्यांना कसे विसरता, असा प्रश्न त्याने केला. आम्ही सर्व एकत्रच असतो. त्यामुळे तुमचा प्रश्न नक्की काय असे सांगत त्याने मूळ प्रश्नाला बगल दिली.
इतर कलाकार घेतात श्रेय
अभिषेकने २००० मध्ये "रिफ्यूजी' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केली. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप झाला. यानंतरही त्याचे अनेक चित्रपट साफ आपटले. धूम सिरीजमध्ये अभिषेक असतो. मात्र, इतर कलाकारच चित्रपटाचे श्रेय घेऊन जातात. "दोस्ताना'मध्ये जॉन अब्राहम होता, तर "बोल बच्चन'मध्ये अजय देवगण हा नायक होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "हाऊसफुल्ल'मध्येही मुख्य अभिनेता हा अक्षय कुमारच आहे. एकूणच अभिषेक बच्चनची कारकीर्द डळमळीत असल्यानेच त्याला या प्रश्नाचा राग आल्याची चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...