आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य दिनाचे निमित्‍त्‍ा साधून अभिषेकचे टि्वटरवर 'बी पॉझिटिव्ह'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्युनियर बी अर्थात बाॅलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या चाहत्यांसाठी आठवड्याची सुरुवात "प्रेम' आणि "बी पॉझिटिव्ह' असे सांगत केली आहे. या उपक्रमाला त्याचे वडील महानायक अमिताभ यांच्यासह असंख्य सेलिब्रिटीज व त्याच्या अनेक चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे.
अभिषेक टि्वटरवर म्हणतो, सध्या सोशल मीडियाचा वापर बहुतांश लोक करत असतात. इंटरनेटविना अनेकांचे काम थांबते. त्यामुळे आज सोशल मीडियाला खूप मागणी आहे. मात्र, सध्या ट्विटरवर मला केवळ नकारात्मक पोस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा संदेश माझ्या चाहत्यांसाठी आहे. "प्रेम' आणि "बी पॉझिटिव्ह' असे सांगत अभिषेकने खासगी आयुष्यात सकारात्मकता आणण्याचे आवाहन अापले चाहते व मित्रांना केले आहे. सकारात्मकतेमुळे तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल, असेही तो म्हणाला.
अभिषेकच्या या मोहिमेला अनेक बॉलीवूडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. अभिनेत्री सोफी चौधरीने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, "लव्ह इट, नीडेड अँड हाऊ, थिंक लाइक अ प्रोटॉन, बी पॉझिटिव्ह.' याप्रमाणेच अभिनेत्री डायना पेंटीने टि्वटवर सांगितले, ‘वेळ आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्यामुळे कायम सकारात्मक असणे गरजेचे. "बी पॉझिटिव्ह' अभिषेक.’
अमिताभ बच्चन यांच्याकडून काैतुक
अभिषेकने टि्वटरवर सुरू केलेल्या सकारात्मक मोहिमेचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले आहे. बी पॉझिटिव्ह... सायना नेहवालचे वर्ल्ड चॅम्पियनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवल्याबद्दल अभिनंदन, असे म्हणत सायनासोबत अमिताभ यांनी आपल्या मुलाचे कौतुक केले आहे.