आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Kapoor And Actress Pragya Yadav Have Tied The Knot

PHOTOS: 'रॉक ऑन'चा दिग्दर्शक अभिषेक कपूर गर्लफ्रेंडसोबत विवाहबद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नाच्या विधी पूर्ण करताना प्रज्ञा यादव आणि अभिषेक कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर सोमवारी लग्नगाठीत अडकला. गर्लफ्रेंड प्रज्ञा यादवसोबत अभिषेकने लग्न केले. 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'रॉक ऑन' या म्युझिकल सिनेमात अभिषेकसोबत काम केलेल्या अर्जुन रामपालने ट्विटरवरुन या नवदाम्पत्याचे छायाचित्र शेअर करुन ट्विट केले, ''माझ्या बेस्ट फ्रेंडचे लग्न. अभिषेक कपूर आणि प्रज्ञा यादवला खूप खूप शुभेच्चा. तुमचा पुढचा प्रवास सुंदर व्हावा.''
'हवा हवाई' या सिनेमात प्रज्ञासोबत काम करणा-या अभिनेता साकिब सलीमनेही या दाम्पत्याला आपल्या शुभेच्छा दिल्या. त्याने ट्विट केले, "प्रज्ञा आणि अभिषेकला शुभेच्छा. आनंदी राहा, सुखा राहा."
2013 पासून प्रज्ञा आणि अभिषेक रिलेशनशिपमध्ये आहेत. आज त्यांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नाच्या पवित्र बंधनात केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिषेक आणि प्रज्ञाच्या लग्नाची खास छायाचित्रे...