Home »News» Abhishek Share Pic Of Amitabh Birthday Bash In Maldives

बिग बींना फॅमिलीने दिले बर्थडे सरप्राइज, मालदीवमध्ये असा सेलिब्रेट झाला 75वा बर्थडे

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 14:03 PM IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस साजरा केला. बिग बींनी त्यांच्या कुटुंबियांसोबत मालदिवमध्ये वाढदिवस साजरा केला. मालदिव बेटांवर निसर्गाच्या सानिध्यात हे सेलिब्रेशन नेमकं कसं झालं, याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच अभिषेक बच्चनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. अवघ्या काही क्षणांतच या फोटोला लाखो लाइक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या.

अभिषेकने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये बिग बी पाठमोरे उभे असून, समोर ‘हॅपी बर्थडे’ असं ज्वालांकित अक्षरांमध्ये लिहिलेलं दिसत आहे. अभिषेकने या फोटोसोबत मोजक्या शब्दात एक कॅप्शन लिहित आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.‘75 अॅण्ड स्टिल स्टाइलिंग….! हॅपी बर्थडे पा’, असं कॅप्शन त्याने या फोटोसोबत दिलं आहे.

पुढे वाचा, अमिताभ यांनी फॅन्सला दिले धन्यवाद...

Next Article

Recommended