आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Shares A Warm Hug With Wifey On Their 9th Wedding Anniversary

9th Wedding Anniversary च्या निमित्ताने अभिषेकने ऐश्वर्याला दिला क्यूट मेसेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिषेकने शेअर केलेला क्यूट फोटो. - Divya Marathi
अभिषेकने शेअर केलेला क्यूट फोटो.

मुंबईः अभिनेता अभिषेक बच्चन आणि माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. २० एप्रिल रोजी बॉलिवूडच्या या क्यूट कपलने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने अभिषेकने सोशल मीडिया अकाउंटवर ऐश्वर्यासोबतचा एक खास फोटो शेअर करुन एक क्यूट मेसेज लिहिला. अभिषेक म्हणतो, “9 years of togetherness, love and hugs!” २० एप्रिल २००७ रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबद्ध झाले होते. या दोघांची एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे.

अमिताभ यांनीही दिल्या शुभेच्छा...
अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक आणि सूनबाई ऐश्वर्या यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या ब्लॉगवर लिहिले, ''उद्याची सुरुवात होताच ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण होतील. आनंदाने भरलेला एक दिवस... या दिवसाने केवळ या दोघांनाच नव्हे तर आम्हा वरिष्ठांनाही एका समान धागेत बांधले आहे.''
पुढे वाचा, मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने दिल्या या क्यूट कपलला शुभेच्छा...