आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तानबूलच्या अतेरिकी हल्ल्यात बॉलिवूड निर्मात्याचा मृत्यू, बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः इस्तानबूलच्या रियान नाइट क्लबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे. 'रोर द टाइगर्स ऑफ सुंदरबन्स', 'टी फॉर ताजमहल', 'ही-मैन' या बॉलिवूड सिनेमांचे निर्माते अबीस रिझवी यांचा नाईटक्लबमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये मृत्यू झाला. अबीस हे माजी राज्यसभा खासदार अख्तर रिझवी यांचे पुत्र होते. सुषमा स्वराज यांनी रविवारी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. या फायरिंगमध्ये 39 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अबीस यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकारांनी अबीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  
 
पूजा भटने व्यक्त केला शोक... 
अबीस यांच्या निधनावर पूजा भटने शोक व्यक्त करताना ट्विट केले,  Devastated to hear that our friend #AbisRizvi was shot dead in the Istanbul nightclub attack. My heart goes out to his family. RIP"। पूजासोबतच गोविंदा, रवीना टंडन, रणदीप हुड्डा, जावेद जाफरीसह अनेक कलाकारांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.  

सुरक्षित आहे कुटुंब 
रिजवी एज्युकेशनल सोसायने त्यांचे सेक्रेटरी अबीस यांच्या निधनाचे वृत्त दिले. अबीर व्हेकेशनवर  त्यांची पत्नी, मुले आणि आईवडिलांसोबत तुर्कीला गेले होते. येथेच ते या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. त्यांचे कुटंबीय सुरक्षित असल्याचे समजते.  

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बॉलिवूड कलाकारांनी केलेले श्रद्धांजली ट्वीट्स...
 
बातम्या आणखी आहेत...