आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबरामला कडेवर घेऊन बाल्कनीत दिसला शाहरुख, Fans केले अभिवादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील शाहरुख आणि थोरली बहीण सुहानासोबत चिमुकला अबराम - Divya Marathi
वडील शाहरुख आणि थोरली बहीण सुहानासोबत चिमुकला अबराम

मुंबईः सोमवारी आपला 50 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानच्या घराबाहेर रविवारी रात्रीपासूनच चाहत्यांची गर्दी जमली आहे. आपल्या सुपरस्टारची एक झलक बघण्यासाठी लोक मन्नतबाहेर उभे आहेत. शाहरुखनेही आपल्या चाहत्यांची मुळीच निराशा केली नाही. बाल्कनीत येऊन त्याने चाहत्यांना अभिवादन केले आणि सोबतच काही छायाचित्रेदेखील सोशल मीडियावर शेअर केलीत.
सोमवारी दुपारी एसआरकेने त्याचा धाकटा मुलगा अबरामलासुद्धा बाल्कनीत आपल्यासोबत आणले होते. चिमुकल्या अबरामनेसुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे चाहत्यांना हात दाखवला. थोड्या वेळाने अबरामची बहीण सुहाना त्याला तेथून घेऊन गेली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मन्नतच्या बाल्कनीत उभे असलेल्या शाहरुख खान, अबराम खान आणि सुहाना खानची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...