आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सालेमच्या शार्प शूटरला अटक, रवीना टंडनच्या पतीला मागितली होती खंडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फाइल फोटो : अनिल थडानी आणि रवीना टंडन (इनसेटमध्ये : जान उस्मान)]
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिचे पती अनिल थडानी यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. दिल्ली क्राइम ब्रांचने अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा शार्प शूटर जान उस्मानला अटक केली आहे. उस्मानवर अनिल थडानी, निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन आणि गायक दलेर मेंहदी यांच्याकडे खंडणी मागण्याचा आरोप आहे. त्याने ही मागणी अबू सालेमच्या सांगण्यावरुन केली, असे म्हटले जाते. इतकेच नाही तर उस्मानवर राकेश रोशन आणि दलेर मेहंदी यांच्यावर गोळ्या झाडल्याचाही आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानवर बळजबरीने पैसे वसूल करणे, हत्या, अवैध शस्त्रे बाळगणे आणि बनावट नोटांचा कारोबार केल्याचा आरोप आहे. अटकेवेळी पोलिसांनी उस्मानकडून एक बंदुक आणि तीन जिवंत कारतुस जप्त केले.
दिल्ली क्राइम ब्रांचचे रविंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमला शनिवारी सूचना मिळाली होती, की उस्मान काही कामानिमित्त काश्मिरी गेट परिसरस्थित आयएसबीटीजवळ येणारेय. त्या माहितीच्या आधारावर संध्याकाळी साडे सातच्या सुमारास पोलिसांनी उस्मानला ताब्यात घेतले.
अबू सालेमशी संबंध
उस्मानचे कुटुंब दिल्लीतील सराय रोहिल्ला या परिसरात वास्तव्याला आहे. 1997 मध्ये उस्मान मुंबईत दाखल झाला. येथे त्याची भेट वसीमसोबत झाली. वसीमनेच त्याची भेट अबू सालेमसोबत घालून दिली होती. वसीमवर टी-सीरीजचे मालक गुलशन कुमारची हत्या केल्याचा आरोप आहे.
बातम्या आणखी आहेत...