आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का शर्माच्या चित्रपटाच्या सेटवर झाला अपघात, एका टेक्निशियनचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनुष्का शर्माचा अपकमिंग चित्रपट 'परी' च्या सेटवर झालेल्या अपघातात एका टेक्निशयनचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कोलकात्यात झाला. त्याठिकाणी अनुष्का आणि परमव्रत चटर्जी दक्षिण 24 परगना जिल्ह्याच्या कोरोलबेरिया मध्ये शुटिंग करत होते. त्याचवेळी करंट लागल्याने टेक्निशियनचा जागेवरच मृत्यू झाला. शाह आलम असे या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. हा व्यक्ती 28 वर्षांचा होता. अपघातानंतर शुटिंग बंद करण्यात आले आहे. 

पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मृतदेह 
- मृत शाह आलम मूळचा उत्तर प्रदेशचा होता. शूटिंग सुरू असलेल्या ठिकाणी बांबूची मोठी मोठी झाडे होती. 
- लाइट इम्पॅक्टसाठी तारांनी सजावट करण्यात आली होती. पण शुटिंगनंतर पॅकिंगदरम्यान आलम यांनी करंट लागला. 
- बेशुद्धावस्थेत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सॉल्टलेक परिसरातील ओइयो रुग्णालयात त्यांना रेफर करण्यात आले. त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला. 
- मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. 

2018 मध्ये रिलीज होणार चित्रपट 
- काही काळापूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक अनुष्काने शेयर केला होता. यात बंगाली अॅक्टर आणि डायरेक्टर परम्ब्रता चॅटर्जीची महत्त्वाची भूमिका आहे.  
- या चित्रपटाद्वारे प्रोसित रॉय डायरेक्‍टर म्हणून पदार्पण करत आहेत. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2018 ला रिलीज होणार आहे. 
- अनुष्काच्या 'क्लीन स्लेट फिल्म्स' आणि kriArj Entertainment प्रोडक्शन हाऊस एकत्रितपणे निर्मिती करत आहेत. 
- अनुष्काने यापूर्वी 'एनएच10' आणि 'फिल्लौरी' ची निर्मिती केली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटाचे पोस्टर.. 
बातम्या आणखी आहेत...