आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीला प्रियकरासोबत पाहून एक्स बॉयफ्रेंड भडकला, केला अॅसिड हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अॅसिड हल्ल्यात अभिनेत्रीचा चेहरा भाजला आहे.)
बलिया- उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये भोजपूरी अभिनेत्रीवर मंगळवारी रात्री (28 जूलै) एका तरुणाने अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्री आणि तिचा सहकारी दोघांचा चेहरा भाजला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, आरोपी आणि अभिनेत्रीमध्ये अफेअर होते. त्यानंतर अभिनेत्रीला दुसरा तरुण आवडायला लागला. त्यामुळे आरोप नाराज होता. कानपूरच्या कँट परिसरात नंदिनी नावाच्या एका गायिकेवरदेखील सोमवारी (27 जुलै) संध्याकाळी बाईस्वार दोन तरुणांनी अॅसिड फेकले. यात गायिकेच्या हाताची बोटे भाजली.
काय आहे प्रकरण-
रसडा कोतवाली परिसरात सुरु असलेल्या सिनेमाच्या शूटींगमध्ये गाजीपूरच्या जखनियाची अभिनेत्री रुपाली मुख्य भूमिका साकारत आहे. यूनिट सदस्य जवळच्या एका शाळेत थांबलेले होते. पोलिसांच्या सांगण्यानुसार, याच यूनिटचा एक सदस्य अजय पुजारी अभिनेत्रीला पसंत करत होता. दोघांचेमध्ये काही काळ अफेअरसुध्दा होते. मात्र अभिनेत्री बिहारच्या विकास कुमारच्या प्रेमात पडली. त्यामुळे अजय नाराज होता. दोघांमध्ये या कारणाने भांडणसुध्दा झाले होते. मंगळवारी (28 जुलै) रात्री सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर सर्व कलाकार आपल्या खोलीत झोपत होते. अभिनेत्री आणि विकास एका खोली झोपलेले होते. मध्यरात्री अजय अचानक खोलीत आला, त्याने अभिनेत्री आणि तिचा सहकारी यांच्या अंगावर अॅसिड फेकले. ओरडण्याचा आवाज ऐकून सर्व जमा झाले. पोलिसांनी अजयला तिथेच अटक केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बातमी संबंधित फोटो...