आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरी कालवश; म्‍हणाले होते, शेवटच्‍या श्‍वासापर्यंत कॅमेरासमोर राहण्‍याची इच्‍छा आहे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ओम पुरी यांचे काल सकाळी निधन झाले. 66 वर्षीय या अभिनेत्‍याने 'अर्धसत्य', 'आस्था', 'मिर्च मसाला', 'तमस', 'विनाशक' यासारख्‍या अनेक गंभीर चित्रपटांसोबतच 'हेराफेरी', 'चाची 420', 'मालामाल वीकली' अशा विनोदी चित्रपटांमध्‍येही शानदार अभिनय केला आहे. dainikbhaskar.com ने ओम पुरी यांची काही काळापूर्वी मुलाखत घेतली हेाती. यावेळी त्‍यांनी आपल्‍या बॉलिवुड करिअरपासून ते व्‍यक्तिगत आयुष्‍याबद्दल सर्व प्रश्‍नांना दिलखूलास उत्‍तरे दिली होती.
 
वाचा, मुलाखतीचा संपादीत अंश 
 
तूम्‍ही आतापर्यंत 260पेक्षा जास्‍त सिनेमात काम केले आहे, या प्रवासाकडे कसे पाहता?
- मी भारतात अनेक गुणवान दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. मात्र श्‍याम बेनेगल आणि गोविंद निहलानी यांच्‍या सोबत जास्‍त सिनेमे केले आहेत. त्‍यांना मी गुरु मानतो. सत्‍यजीत रे, बासु चॅटर्जी आणि बासु भट्टाचार्य यांच्‍यासह आजच्‍या युवा दिग्दर्शकांसोबतही काम केले आहे. अभिनय करायला मला फार आवडतेे. शेवटच्‍या श्‍वासापर्यंत कॅमेरासमोर राहण्‍याची माझी इच्‍छा आहे.
 
बॉलिवुड आणि हॉलिवुडमधील ताळमेळ कसा सांभाळता? 
- करिअरच्‍या सुरवातील मी श्‍याम बेनेगल आणि गोविंद निहलानींसारख्‍या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्‍यांचे चित्रपट वास्‍तववादी असत. असे चित्रपट आता फारसे बनत नाहीत. मात्र मी एक व्‍यवसायिक अभिनेता आहे. त्‍यामुळे बॉलिवुड असो की हॉलिवुड, मनोरंजनपर सिनेमा असो की कलात्‍मक सिनेमा, मला नै‍सर्गिेक पध्‍दतीने अभिनय करायला आवडतो. सिनेमे निवडताना मी याचाच विचार करतो. हेच कारण आहे की, ब्रिटीश सिनेमा करता करता मी हिंदी सिनेमातही काम करु शकतो. 
 
आम्‍हाला असे कळले आहे की, तुम्‍ही हॉलिवुड प्रोजेक्ट मध्‍ये काम करत असताना हॉटेलमध्‍ये राहण्‍याएवजी अपार्टमेन्‍टमध्‍ये राहण्‍यास प्राधान्‍य देतात? 
- हो, हे खर आहे. मात्र याचे एकच कारण आहे ते म्‍हणजे खाणे. मला विदेशामध्‍ये बाहेर जेवायला आवडत नाही. घरगुती जेवणालाच मी नेहमी प्राधान्‍य देतो. तसेच तेथे शनिवार, रविवार सुट्टया असल्‍यामुळे हे दोन दिवस मी घरातच स्‍वत:साठी जेवण तयार करु शकतो. त्‍यामुळे मी निर्मात्‍याला नेहमी विनंती करतो की, मला हॉटेलएवजी अपार्टमेन्‍टमध्‍ये राहण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, मुलाखतीचा पुढील भाग 
 
बातम्या आणखी आहेत...