आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Death Mystery: Actor Annu Kapoor Indirectly Accuses Om Puri's 2nd Wife Nandita Puri

अन्नू कपूरने सोडले मौन, वारंवारच्या अपमानामुळेच पहिल्या पत्नीकडे परतणार होते ओम पुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अखेरच्या दिवसांमध्ये ओम पुरींची दुसरी पत्नी नंदिता त्यांचा वारंवार अपमान करत होती, असा दावा अन्नू कपूर यांनी केला आहे. अन्नू कपूर यांची बहीण सीमा कपूर ओम पुरींची पहिली पत्नी होती. वारंवार होणाऱ्या अपमानांमुळेच ओम पुरी यांची पुन्हा पहिल्या पत्नीशी जवळीक वाढली होती, असे ते म्हणाले आहेत. 
 
आणखी काय म्हणाले अन्नू कपूर...
- अन्नू कपूर म्हणाले की, ओम पुरी यांचे लग्न त्यांच्या बहिणीशी झाले होते. पण एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला होता. 
- अन्नू कपूर यांनी नंदिता यांचे नाव न घेता म्हटले की, ओम पुरी परेशान होते. त्यांना वारंवार अपमानित केले जात होते. 
- जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाकडून, पत्नीकडून, मुलाकडून प्रेम मिळत नाही, तेव्हा त्याला फाल दुःख होत असते. मग तो अशा व्यक्तीकडे जातो ज्या व्यक्तीला त्याने प्रवासात मागे सोडलेले असते. त्यामुळेच ओम पुरी सीमाच्या संपर्कात होते. 
- अन्नू कपूर म्हणाले, ओम पुरी आणि नंदिता यांच्यातीन नाते फारसे चांगले नव्हते. 
- ओम पुरींनी जेव्हा माझी पहीण सीमाला घटस्फोट दिला तेव्हा तिला फार दुःख झाले होते. त्यावेळी तिने फार वेदना सहन केल्या. 
- सीमा आणि नंदिताबाबत सांगण्यासरखे बरेच आहे पण ही वेळ योग्य नाही असे ते म्हणाले.
- जेव्हा तुम्ही एखाद्याचे घर उध्वस्त करता तेव्हा तुम्ही आनंदी कसे राहाल, असे ते म्हणाले. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काय म्हणाले अन्नू कपूर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...