आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रईस’च्या प्रदर्शनासाठी छदामही देणार नाही; अभ‍िनेता फरहान अख्तरचा मनसेला टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘शाहरुख खान पाकिस्तानी अभिनेत्रीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कुणालाही आपण एक छदामही देणार नाही’, असा टोला या चित्रपटाचा निर्माता फरहान अख्तरने मनसेचे नाव घेता लगावला अाहे.

फरहान म्हणाला, रईस चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान हिची भूमिका आहे. मात्र, कुणी या चित्रपटाला विरोध केल्यास आपण तडजोड करणार नाही. ‘एे दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून झालेला वाद अतिशय दुर्दैवी आहे. शेजारी देश आपला शत्रू आहे. मात्र, कलाकारांना कोणत्याही सीमा नसतात, असेही तो म्हणाला. करण जोहरचे दिग्दर्शन असलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट मनसेने विरोध मागे घेतल्यानंतर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा यांच्यासह पाकिस्तानी कलाकार फवाद खानचीही भूमिका आहे. मात्र, या चित्रपटाला मनसेने विराध केला होता. चित्रपटाचे निर्माते, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाल्यानंतर मनसेने लष्कराला पाच कोटी रुपये देण्याच्या बोलीवर चित्रपटाला विरोध मागे घेतला. मात्र, त्यानंतर गिल्ड प्रोड्युसरचे मुकेश भट आणि फडणवीस यांनी पाच कोटी रुपयांबाबत बैठकीत काहीही चर्चा झाली नसल्याने सांगितल्याने मनसे तोंडावर पडली.

फरहानच्या ‘लक्ष्य’वर होती पाकमध्ये बंदी
फरहान अख्तरने ‘दिल चाहता है’ या चित्रपटानंतर ‘लक्ष्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात हृतिक रोशनने मुख्य भूमिका साकारली होती. भारतासह परदेशात या चित्रपटाचे विशेष कौतुक झाले होते. मात्र, त्याच वेळी पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धावर आधारित होता.
बातम्या आणखी आहेत...