आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जाखाली दबलेल्या या कॉमिडियनला नाही मिळत काम, नाइलाजाने मुलीच्या घरी घेतला आसरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकेकाळचा फेमस रायटर आणि कॉमेडियन लिलिपूट आज एक-एक पैशांसाठी मोहताज आहे. त्यांच्यावर एवढे कर्ज झाले आहे की आता त्यांना त्यांच्या मुलीच्या घरी आसरा घ्यावा लागत आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, हा खुलासा स्वतः लिलिपूट यांनी केला आहे. लिलिपूट यांचे खरे नाव एम.एम. फारुखी आहे. 90 च्या दशकात त्यांना प्रसिद्ध टीव्ही शो 'देख भाई देख'चे रायटर म्हणून ओळखले जात होते. 

 

आज कामाच्या शोधात दारोदार भटकतात
- लिलिपूट यांनी सांगितल्यानुसार, गेली पाच वर्षे त्यांच्यासाठी मोठे कसोटीचे राहिले आहेत. ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून आता त्यांना कामही मिळत नाही. 
- लिलिपूट यांनी सांगितले, की एक वर्षापासून मी दोन स्क्रिप्ट्स घेऊन प्रोड्यूसर्सच्या ऑफिसमध्ये चक्कर मारत आहे. कोणी म्हणतो, विचार करु तर कोणी टोमणे मारुन काढून देतात. 

 

कमी उंचीमुळे फार सहन करावे लागले... 
- लिलिपूट यांनी त्यांच्या सिरीयस रोलबद्दल सांगितले, की 1998 मध्ये टीव्ही सीरियल 'वो'मध्ये त्यांनी नॉन कॉमिक रोल केला होता. स्टिफन किंगच्या एका हॉरर कादंबरीवर ही सीरियल बेतलेली होती. या सीरियलमध्ये जेव्हा त्यांनी काम केले तर एक स्टार (त्याचे नाव सांगण्यास लिलिपूट यांनी नकार दिला) म्हणाला होता, तू गंभीर भूमिकाही करतो. मला वाटले बुटके फक्त कॉमिडी रोलसाठी बनलेले असतात. 
- लिलिपूट यांनी सांगितल्यानुसार, एका उच्च शिक्षित अॅक्टरने त्यांच्यावर जोक करताना म्हटले होते की लिलिपूटचा पेजर नंबरही त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्यावेळी मी उत्तर दिले होते, की काही लोकांची जीभही माझ्यापेक्षा लांब असते, काय करणार.

 

1975 मध्ये मुंबईत आले होते लिलिपूट
- लिलिपूट यांनी सांगितले, की डिसेंबर 1975 मध्ये ते मुंबईत आले होते. अॅक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मी माझा स्वतःचा ब्रँड तयार करेल असा विचार केला होता. मी विचार केला होता, की एवढ्या मोठ्या बॉलिवूडमध्ये माझ्या सारख्या बुटक्याला खूप मजेदार रोल मिळतील. त्यामुळे मी माझे नाव लिलिपूट ठेवले होते आणि ऑडिशन देण्यास सुरुवात केली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, इंडस्ट्रीत कसा आला अनुभव... 

बातम्या आणखी आहेत...