आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला पितृशोक, हृदयविकाराच्या झटक्याने निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे वडील नवाबुद्दीन सिद्दीकी यांचे पार्थिव, इनसेटमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी - Divya Marathi
फोटो: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे वडील नवाबुद्दीन सिद्दीकी यांचे पार्थिव, इनसेटमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी

नवी दिल्ली : 'बजरंगी भाईजान' सिनेमामुळे घराघरांत पोहचलेला सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला पितृशोक झाला आहे. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे नवाझचे वडील नवाबुद्दीन यांचे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. पॅरालिसिसमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना सहारनपुर येथील तारावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी त्यांच्या बुढाना या गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये येथे ते वास्तव्याला होते.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईतसुद्धा त्यांच्यावर उपचार झाले होते. मात्र सोमवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर नवाजुद्दीनचे धाकटे भाऊ फैजुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांना सहारनपूर येथील तारावती रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर सहारनपूरमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.
पुढे वाचा, नवाबुद्दीन यांच्या सात मुलांमध्ये थोरले आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी...