आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दस-याच्या शुभ मुहूर्तावर नीलचा साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची वागदत्त वधू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध गायक दिवंगत मुकेश यांचा नातू आणि नीतिन मुकेश यांचा मुलगा नील नीतिन मुकेश लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मंगळवारी दस-याच्या शुभ मुहूर्तावर जुहू येथील एका हॉटेलमध्ये नीलचा मुंबईच्याच रुक्मिणी सहाय हिच्याशी साखरपुडा झाला असून पुढच्या वर्षी ते दोघे लग्न करणार आहेत.

नील-रुक्मिणीचे अरेंज मॅरेज
34 वर्षीय नील आणि 27 वर्षीय रुक्मिणी यांचे अरेंज मॅरेज असून दोन्ही कुटुंबिय एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. आपल्या मुलाच्या भावी आयुष्याबद्दल त्याचे वडील, गायक नितीन मुकेश, खूप आनंदी आणि उत्साही असून आपल्या होणा-या सुनेने, रुक्मिणीने आधीच आम्हा सर्वांची मनं जिंकली आहेत, असं ते म्हणाले.

दस-याच्या शुभममुह्रूतावर झालेल्या या साखरपुड्याला नील व रुक्मिणीचे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी नील काळा व मरून रंगाच्या शेरवानीत उठून दिसत होता. तर रुक्मिणीने निळा व गुलाबी रंगाचे काँबिनेशन असलेला पारंपारिक लेहंगा परिधान केला होता.

कोण आहे रुक्मिणी सहाय...
रुक्मिणी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आहे. तिचे शिक्षण मुंबईतील लीलावती बाई पोदार हायस्कूलमधून झाले आहे. सध्या ती ACASS रिक्रूटमेंट कंपनीत काम करते.

या फिल्म्समध्ये दिसला नील...
'जॉनी गद्दार', 'न्यूयॉर्क', 'सात खून माफ', 'वझीर', 'प्रेम रतन धन पायो' यांसह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, नील-रुक्मिणीच्या साखरपुड्याचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...