आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' प्रभासने पछाडले \'थलईवा\' रजनीला, मादाम तुसादमध्ये एंट्री करणारा पहिलाच साऊथ स्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केवळ ४ दिवसांत जगभरात ६०० कोटी कमविणाऱ्या 'बाहूबली २' ने चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. यातील मुख्य भूमिका करणारा अभिनेता प्रभासची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. आता या लोकप्रियतेत भर म्हणून मादाम तुसाद म्युझियममध्ये प्रभासची वर्णी लागली आहे. यामुळे त्याच्या फॅन्समध्ये यामुळे सध्या आनंदाची लहर आहे. 
 
रजनीकांत, कमल हसनलाही टाकले मागे...  
 
साऊथ चित्रपटांत देवाचे स्थान असलेल्या रजनीकांत तसेच कमल हसन यांनाही अजून हा सन्मान मिळालेला नाही. पण त्यांच्यासारख्या मोठ्या स्टारलाही पछाडत प्रभासने 
लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रभासच्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. 
 
प्रभासचा मेणाचा पुतळा बँकॉक येथे ठेवण्यात आला आहे.
 
२३ ऑक्टोबर १९७९ रोजी जन्मलेल्या प्रभासचे खरे नाव प्रभास राजू उप्पलापति आहे. प्रभासला त्याच्या तेलुगू चित्रपटातील अभिनयामुळे ओळखले जाते. २००२ साली 'ईश्वर' चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर प्रभासने 'राघवेंद्र' (2003), 'वर्षं' (2004), 'चक्रम' (2005), 'योगी' (2007), 'एक निरंजन' (2009), 'रेबेल' (2012), 'बाहुबली : द बिगनिंग' (2015) आणि 'बाहुबली-2' (2017) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
 
पुढच्या काही स्लाईडवर पाहा, प्रभासचे म्युझियममधील फोटोज्
बातम्या आणखी आहेत...