आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानशी संबंध नकोच; अभिनेता रोनीतची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी दहशतवादी सातत्याने भारतावर हल्ले करतात. त्यामुळे पाकिस्तानशी काेणतेही संबंध ठेवू नयेत, अशी भूमिका “डोंगरी का राजा’ चित्रपटातील अभिनेते अश्मित पटेल आणि रोनित रॉय यांनी मांडत उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पाकिस्तानने अापल्याला व्हिसा कसा नाकारला याची माहिती अश्मितने या वेळी दिली.
पी. एस. चटवाल यांचा पहिला हिंदी चित्रपट “डोंगरी का राजा’चा ट्रेलर नुकताच मुंबईतील एका हॉटेलमध्ये लाँच करण्यात आला. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेळी मुख्य अभिनेत्यांसह चित्रपटाचे दिग्दर्शक हादी अली अबरार उपस्थित होते.
चटवाल म्हणाले, चित्रपट निर्मिती करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मात्र, या चित्रपटाची कथा आवडल्याने यासाठी तयार झालाे. दिग्दर्शक अबरार यांनी डोंगरीत जाऊन चित्रपटाचे चित्रीकरण केले. चित्रपटात गश्मीर महाजनी आणि रोनित रॉय यांनी खूप चांगले काम केले असून हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. दिग्दर्शक अबरार म्हणाले, अंडरवर्ल्ड हा प्रेक्षकांचा आणि चित्रपट निर्मात्यांचा आवडता विषय आहे. या विषयावर अनेकांनी चित्रपट तयार करून स्वतःची छाप सोडली आहे. डोंगरीने अनेक डॉन दिले आहेत, ज्यात हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम यांचा समावेश आहे. मात्र, माझ्या चित्रपटात अंडरवर्ल्ड असले तरी यापैकी कोणाच्याही जीवनावर हा चित्रपट आधारित नाही. एका गँगस्टरची ही प्रेमकथा असल्याचे ते म्हणाले.
पाकने व्हिसा नाकारला
^‘नजर’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी मी लाहोरला गेलो होतो. त्या वेळी नायिका वीणाचे मी चुंबन घेतले. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी पाकिस्तान सरकारने मला व्हिसा दिला नाही. आपल्या सैनिकांवर हल्ला करणाऱ्यांशी आपणही तसेच वागायला हवे. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. -अश्मित पटेल, अभिनेता
बातम्या आणखी आहेत...